| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी व कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे नेते नारायण नागू पाटील तथा नाना यांच्या पुण्यतिथी अलिबागमध्ये विविध ठिकाणी साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
अलिबाग येथील शेतकरी भवन येथे नानांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. तेथील कर्मचारी, कार्यकर्त्यांनी नारायण पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले. यावेळी संदीप सारंग, सतीश देशमुख, नयन पाटील, संतोष जवके, राकेश कदम आदी उपस्थित होते. तसेच, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक कला मंचच्या वतीनेदेखील पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुप्षहार घालण्यात आले. यावेळी भाल येथील ज्येष्ठनागरिक संघाचे अध्यक्ष श्रीरंग घरत, माजी नगरसेवक आर. के. घरत, सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालयाचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक, कोकण साहित्य परिषद अलिबागचे सहकार्यवाह नंदू तळकर, हेमकांत सोनार, ग्रंथपाल ज्योती म्हात्रे, झेबा कुरेशी आदी मान्यवर, पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नागेश कुलकर्णी यांनी नानांच्या कार्याची माहिती दिली.