| पाली | वार्ताहर |
राबगाव ग्रामपंचायत ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या सरपंच स्नेहा भोईर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. त्यात तंटामुक्त अध्यक्षपदी मनोज भोईर याची निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक याच्या सह ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर माध्यमांशी बोलताना भोईर म्हणाले की गावात शांतता व सलोखा राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, तसेच स्व. गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून पोलिसांवरील कामाचा ताण कमी तसेच गावातील किरकोळ भांडणे गावातच मिटावीत यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असा विश्वास भोईर यांनी यावेळी व्यक्त केला. या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.