मुक्तअभियान व्याख्यानाचे आयोजन
| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये महिला सबलीकरण कक्ष, अर्थशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने स्टे फाईन यांच्या मार्फत कॅन्सर मुक्त अभियान आरोग्य जनजागृती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी स्नेहल मिरकुटे उपस्थित होत्या.
त्याचबरोबर त्यांचे सहकारी प्रतिनिधी किरण मोरे आणि संतोष मोरे हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी स्नेहल मिरकुटे यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळी मध्ये वापरले जाणारे सॅनिटरी पॅड याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले व इतर कंपन्यांचे सॅनिटरी पॅड आणि स्टे फाईन कंपनीतर्फे तयार करण्यात आलेले सॅनिटरी पॅड यावर तुलनात्मक प्रात्यक्षिक करून दाखवले. त्याचबरोबर मासिक पाळी मध्ये येणाऱ्या समस्या तसेच दखल न घेतली गेल्यामुळे भविष्यामध्ये होणारे कॅन्सर सारखे भयंकर आजार, फंगल इन्फेक्शन यांसारख्या विविध विषयांवर विद्यार्थिनींना समुपदेशन केले.
या कार्यक्रमास महिला सबलीकरण कक्षाच्या प्रमुख प्रा. पूजा म्हात्रे तसेच प्रा. योगिता पाटील, प्रा. सुझेन बेलोस्कर आणि शलाका पंडित, प्रा. पल्लवी पाटील, प्रा. पूजा पाटील, डॉ. रसिका म्हात्रे व प्रा. प्राची वैद्य, प्रा. नम्रता पाटील, प्रा. केतकी पाटील उपस्थित होत्या. या कार्यक्रमास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ. रसिका म्हात्रे यांनी मानले.