। वावोशी । वार्ताहर ।
खालापूरातील वावोशी गावात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कै. नाना टिळक शाळा, दांडवाडी प्राथमिक शाळा व वावोशी ग्रामपंचायतमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी या महापुरुषांना अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले. वावोशी मधील कै. नाना टिळक प्राथमिक शाळा, दांडवाडी जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायतमध्ये ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जलसाक्षरता व भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून प्रतिज्ञा घेण्यात आली. कै. नाना टिळक प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण मुख्याध्यापिका विद्या घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राम वाघमारे, वावोशी ग्रामपंचायतच्या उपसरपंच दीपा शिर्के व समस्त ग्रामपंचायत कार्यकारिणी, शिक्षक, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.






