| मुंबई | वृत्तसंस्था |
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना 2 फेब्रुवारीला विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. दुसर्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या अडचणी वाढत आहेत.
टीम इंडियाचे दोन दिग्गज खेळाडू रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुसर्या कसोटी सामन्यातून बाहेर पडले आहेत. जडेजाच्या स्नायूंला ताण आला होता. त्यामुळे जडेजाची दुखापत गंभीर असू शकते. दुसरीकडे, केएल राहुल या मालिकेत पुनरागमन करू शकतो. रवींद्र जडेजा संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला तर भारतीय संघासाठी हा मोठा धक्का आहे. दुसरीकडे, रोहित शर्मा, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर आधीच फॉर्ममध्ये नाहीत. त्यामुळे आता पुन्हा एकदा भारतीय संघासमोर इंग्लंडला दुसर्या कसोटी सामन्यात पराभूत करण्याचे कठीण आव्हान असणार आहे.