। मुंबई । प्रतिनिधी ।
बुलडाणा येथे दि.3 ते 7 सप्टेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरावरील पुरुषांसाठीच्या 90 व्या एलाइट मेन्स महाराष्ट्र स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये वीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या विघ्नेश खोपडे आणि मृणाल झरेकर यांनी सुवर्णपदक पटकावले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर येथील वीर सावरकर बॉक्सिंग क्लबमधील मुष्टियोद्धे हे मुंबई जिल्हा मुष्टियोद्ध्यांच्या चमूचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. या स्पर्धेसाठी गेलेल्या चमूमधील या दोघांनी सुवर्णपदक मिळवले असून आता एलाइट मेन्स नॅशनल बॉक्सिंग चँपियनशीपसाठी कर्नाटकातील बेल्लारी येथे ते जाणार आहेत. बेल्लारी येथे 15 ते 22 सप्टेंबर या दरम्यान ही मुष्टियुद्ध स्पर्धा होणार आहे.