। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव येथील निलेश आनंद साळवी यांच्या मातोश्री कालकथित शांताबाई आनंद साळवी यांचे मंगळवारी (दि.6) वृध्दापकाळाने वयाच्या 95व्या वर्षी राहत्या घरी साईनगर पूर्व माणगाव येथे निधन झाले. त्यांच्या पश्च्यात एक मुलगा, तीन मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.
कालकथित शांताबाई साळवी यांचा जलदान विधी व शोकसभा (उत्तर कार्य) रविवारी (दि.18) सकाळी साडेअकरा वाजता साई नगर पुर्व, माणगांव येथे होणार असल्याचे त्यांचे सुपुत्र निलेश साळवी यांनी सांगितले.