| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहर पोलिसांनी बेकायदेशीररीत्या वास्तव्य करण्याऱ्या परकीय नागरिकांविरोधात कारवाई सुरु करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण भगत, पोउपनि अभयसिंह शिंदे, गोविंद दाभाडे, पो हवालदार नितीन वाघमारे, परेश म्हात्रे, पो नाईक रविंद्र पारधी, विनोद देशमुख, पो शिपाई प्रसाद घरत, नितीन कांबळे, साईनाथ मोकळ यांचे पथक पनवेल परिसरात झाडाझडती घेत असताना मूळ बांगलादेशात वास्तव्यास असलेले आणि पनवेल तालुक्यातील विविध परिसरात राहणारे आरोपी सामीऊल बिरु काझी (24) सध्या रा. भारतनगर खाडी जवळील झोपडीत, मुबारक हाशिमअली गाजी (57) सध्या रा. कच्छि मोहल्ला मधील झोपडीत, इक्राम बादशाह शेख (24) आणि रसल बाबुल शेख (24) हे पळस्पे परिसरातून संशयितरित्या फिरत असताना सापडले. त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता ते कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्राविना भारत- बांगलादेश सिमेवरील मुलकी अधिकाऱ्याच्या लेखी परवानगी शिवाय अवैध मार्गाने भारत बांगला सिमेवरुन भारतात प्रवेश केल्याचे आढळून आले. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी या चौघांविरोधात कारवाई सुरु केली आहे.