| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील मोठेभोम येथील अष्टविनायक मित्र मंडळ व महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने परिसरातील स्थानिक रसिकांच्या मनोरंजनासाठी स्टेप आर्ट डान्स अकॅडमी प्रस्तुत ‘रत्ने महाराष्ट्राची’ या मराठमोळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
रायगडभूषण नितेश पंडित यांच्या निर्मितीतून साकारण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवार, दि. 16 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता मोठेभोम येथे उद्योजक राजेंद्र खारपाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चिरनेर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन घबाडी, अष्टविनायक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष घनश्याम पाटील, चिरनेर ग्रामपंचायतीच्या सदस्या भारती ठाकूर, इंटकचे उरण तालुका अध्यक्ष राजेंद्र भगत, मोठीजुई ग्रामपंचायतीचे शेखर केणी, भोमगावचे माजी अध्यक्ष विजय केणी, सामाजिक कार्यकर्ते किशोर केणी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. पाच दिवस चालणार्या या माघी गणेशोत्सवाची निर्मिती घनश्याम पाटील, किशोर केणी, मनोज ठाकूर यांच्या आर्थिक मदतीतून करण्यात आली.