| रायगड | प्रतिनिधी |
दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. मोहीमेचे आयोजन महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्या., रायगड व सारथी यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार हिरोजी इंदलकर किल्ले संवर्धन उपक्रम अंतर्गत छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे, रायगड विभागातील एमएस-सीआयटी व सारथी प्रशिक्षण संस्थामध्ये सी.एस.एम.एस. डीप डिप्लोमा कोर्सचे प्रशिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमाची सांगता रायरेश्वराचे दर्शन घेऊन करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारथीचे सहसंचालक संदीप पवार, एम.के.सी.एल. मंगेश जाधव, सिद्धेश गोसावी, विश्वास मते, माधव गोरे व सारथी प्रकल्पामध्ये काम करत असलेले केंद्र आस्क मी कॉम्पुटर माणगांव, शरयू कॉम्प्युटर एज्यूकेशन माणगांव, महाराष्ट्र इंस्टिट्यूट गोरेगांव, आयकॉन कॉम्पुटर म्हसळा, क्रिएटिव इंस्टिट्यूट श्रीवर्धन, सरस्वती कॉम्प्युटर एज्युकेशन बोर्ली, करिअर कॉम्पुटर महाड, समृद्धी कॉम्पुटर पोलादपूर या केंद्रांचे केंद्रचालक, केंद्र सहाय्यक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे कार्य पाहून खा. सुनील तटकरे, आ. अनिकेत तटकरे, उमा मुंडे तसेच, गडावर पर्यटनास आलेल्या सर्वच पर्यटकांनी व सारथी अधिकार्यांनी विद्यार्थांचे कौतुक केले.