इमारतीची दुरावस्था, लाखोंच्या साहित्याची धूळधाण
| कोर्लई | वार्ताहर |
देशावर कोरोनाचे महामारीचे मोठे संकट मार्च 2020 पासुन या आले होते. यावेळी रुग्णालयात रुग्ण सुविधा कमी पडत असल्याने शाळा, महाविद्यालय, शासकीय विश्रामगृह ताब्यात घेऊन या ठिकाणी कोविड केंद्र सुरू करण्यात आली होती. आता या इमारतीची दुरावस्था झाली आहे. इमारतीमधील लाखोंच्या साहित्याची अक्षरशः धूळधाण झाली आहे. मुरुड जंजिरा हा पर्यटन स्थळ असल्याने येथे अनेक शासकीय अधिकारी, कर्मचाऱी, पर्यटक येत असतात त्यांच्या निवासाची गैरसोय होत आहे. त्यामुळे या शासकीय विश्रामगृहाच्या दुरावस्थेला पाच वर्षे सरली असून यातून मोकळा श्वास कधी घेणार ? असा सवाल जनमानसातून उठत आहे.
कोरोना नंतर चार वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. मुरुडमध्ये पर्यटकांचा ओघ सुरू झाला असून जंजिरा किल्ला पाहण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी सुद्धा येत असतात. त्यांच्या निवासाची व्यवस्था ही शासकीय विश्रामगृहात होत नसल्याने त्यांना न थांबताच परतावं लागत आहे. तरी हे मुरुडचे शासकीय विश्रामगृह अद्यापही कोरोनाच्या कचाट्यातून मुक्त झालेले नसल्याने हे विश्रामगृह कोरोनाच्या कचाट्यातून कधी मुक्त होणार ? असा सवाल उठत आहे.
शासनाच्या संबंधित महसूल, आरोग्य व सार्वजनिक बांधकाम खात्याने यात लक्ष पुरवून सार्वजनिक बांधकाम खात्याचे विश्रामगृह लवकरात लवकर खुले व्हावे. अशी भावना व्यक्त केली जात आहे.
कोरोना काळात कोविड सेंटर साठी या शासकीय विश्रामगृहाचा वापर करण्यात आला होता त्यामुळे या विश्राम गृहाची पार दुरावस्था झाली आहे. याचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी टेंडर काढण्यात आले आहेत. टेंडर मंजूर झाल्यानंतर विश्राम गृहाचे लवकरच नुतनीकरण करण्यात येईल व सर्वांसाठी खुले होईल.
रमेश गोरे
सा. बा. वि. मुरूड उपविभागीय अधिकारी