। अलिबाग । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे महामार्गावर रविवारी (दि.25) रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात सात वाहने एकमेकांना धडकली. त्यामुळे वाहनांचे नुकसान झाले असून चालकासह काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली असून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे काम वाहतूक पोलीसांचे युद्ध पातळीवर आहे. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अपघातात तीन कार, ट्रक व अन्य वाहनांचा समावेश आहे.
यापूर्वी याच मार्गावर एक अपघात झाला असून एकजण मयत झाला आहे. त्याचा मृतदेह खोपोली रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे.