| कोलाड | वार्ताहर |
कोलाड हायस्कूलजवळ असलेल्या गोदा नदीच्या पुलाखाली बुधवारी (दि.13) सकाळच्या सुमारास अनोळखी बेवारस पुरुष इसमाचा मृतदेह नदीच्या पाण्यात तरंगताना आढळून आला आहे.
सदर मयत इसमाचे कोणी नातेवाईक असल्यास कोलाड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी केले आहे. आंबेवाडी कोलाड गावच्या हद्दीत कोलाड हायस्कूलच्या पुढे असणार्या गोदा नदीच्या पुलाखाली बेवारस अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पुढील तपास कोलाड सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली चौधरी, गायकवाड करीत आहेत.







