| उरण | वार्ताहर |
इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडेरेशन लंडन या बहुराष्ट्रीय संघाच्या शिष्टमंडळाची जेएनपीए बंदराला भेट दिली. आयटीएफ लंडन या बहुराष्ट्रीय संघाच्या प्रतिनिधींची दोन दिवसीय परिषदत आयोजन करण्यात आली होती. मुंबई येथील अॅम्बेसेडर हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या परिषदेसाठी पॅट्रीक, एनरिको (लंडन) तसेच, जेन्स व चेकर (स्विडन) राजेंद्र गिरी (दिल्ली) हे आयटीएफचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. न्यू मॅरिटाईम अॅण्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा आयटीएफ या बहुराष्ट्रीय संघाच्या लॉजिस्टिक्स् सेक्टरचे व्हाईस चेअरमन कामगार नेते महेंद्र घरत यांच्या उपस्थितीत या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. या परिषदेसाठी देशभरातून दहा आयटीएफशी संलग्न असलेल्या संघटनांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. या परिषदेत जगभरातील कामगारांचे प्रश्न व समस्या यावर चर्चा झाली.
इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडेरेशन लंडन (आयटीएफ) या बहुराष्ट्रीय संघाच्या शिष्टमंडळाने जेएनपीए बंदराला भेट दिली. प्रशासकीय इमारतीत जेएनपीएच्या मुख्य प्रबंधक तथा सेक्रेटरी मनीषा जाधव व त्यांच्या सहकार्यांनी ध्वनीचित्रफितीद्वारे कार्यप्रणालीची माहिती दिली. त्यानंतर शिष्टमंडळाने जेएनपीएच्या बंदराच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहाणी केली. यावेळी कामगार नेते महेंद्र शेठ घरत, जेएनपीए बंदराच्या व्यवस्थापन वरिष्ठ अधिकारी मनिषा जाधव तसेच, उपस्थित कामगारांनी शिष्टमंडळाच्या पदाधिकार्यांचे स्वागत करुन जेएनपीए बंदरासंदर्भात माहिती दिली.