| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलजवळील दांड फाटा येथे एका रिक्षाने कारला पाठीमागून धडक दिल्याने तिघे जण जखमी झाले. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
रुपेश रिकामे हा रिक्षाने आई-वडील व भाचा यांना घेऊन खोपोली येथे बहिणीकडे जात होता. जुना मुंबई-पुणे हायवे साईकृपा हॉटेलसमोर, दांडफाटा येथे त्यांची रिक्षा कारला पाठीमागून धडकली. यात रुपेशचे आई-वडील आणि भाच्याला दुखापत झाली. यात रिक्षाचेदेखील नुकसान झाले असून, कारच्या पाठीमागच्या बाजूचे नुकसान झाले. जखमींना आधार हॉस्पिटल, पनवेल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.