। भिलजी । वार्ताहर ।
संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्यावतीने संत निरंकारी भवन भिलजी या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये 80 निरंकारी भक्तांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले. निरंकारी भक्तांबरोबर अनेक सज्जनांनीही या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला. जिल्हा शासकीय रक्तपेढी अलिबाग यांनी रक्त संकलन केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रवीण पाटील समवेत देवानंद पाटील यांनी केले. यावेळी रक्तपेढी संक्रमण अधिकारी डॉ. शीतल स्वामी तसेच, भिलजी गावातील ग्रामस्थ व अनेक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी या शिबिरास सदिच्छा भेट देऊन संत निरंकारी मिशनच्या कार्याचे कौतुक केले.