| खोपोली | वार्ताहर |
खोपोलीमधील खाजगी व शासकीय शाळांमधील प्रत्येकी एक उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार हा त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने निवडून दिलेल्या 14 शिक्षकांना इनरव्हील क्लबच्या मीटिंगमधे रोटरी क्लबच्या अध्यक्षा व इनरव्हील क्लबच्या पिडिसी डॉ सावित्री रघुपती यांच्या हस्ते अवॉर्ड व सर्टिफिकेट देण्यात आले. यावेळी अध्यक्ष श्रीदेवी यांनी आलेल्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांचे स्वागत केले. ह्यावेळी उपस्थित अवॉर्ड मिळालेल्या शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या संपूर्ण प्रोजेक्टच्या प्रमुख सीएलसिसि डॉ.रश्मी टिळक व ईनरव्हीलच्या इतर सदस्यांनी या प्रोजेक्टसाठी सहकार्य केले. या कार्यक्रमावेळी सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षक त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि फॅमिली मेम्बर्स व ईनरव्हीलच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या.