| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 मधील पहिला विजय मिळवला आहे. पहिल्या तीन सामन्यांमधील पराभवानंतर घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने पहिल्या विजयाला गवसणी घातली आहे. मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 5 बळी गमावत 234 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकांमध्ये 8 बाद 205 इतक्या धावा करता आल्या. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर 29 धावांनी विजय मिळवला आहे.
मुबंई इंडियन्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 5 बळी गमावत 234 धावा केल्या. मुंबईच्या डावाची सुरुवात करणाऱ्या रोहित शर्मा आणि इशान किशनने 80 धावांची सलामीची भागिदारी केली. रोहित शर्माला अक्षर पटेलने 49 धावांवर बाद केले. यानंतर फलंदाजीला आलेला सूर्यकुमार यादव शुन्यावर बाद झाला. इशान किशनला देखील अक्षर पटेलने बाद केले. इशान किशनने 42 धावा केल्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पांड्या आणि टीम डेव्हिडने मुंबईचा डाव सावरला. हार्दिक पांड्यानं 39 धावा केल्या तर टीम डेव्हिडनं 45 धावा केल्या.
मुंबईकडून पहिली मॅच खेळणाऱ्या रोमारियो शेफर्डनं 10 बॉलमध्ये 39 धावा केल्या. शेफर्डनं 4 सिक्स आणि 3 चौकारांच्या जोरावर मुंबईला 234 धावांपर्यंत पोहोचवले. शेफर्डनं 20 षटकांमध्ये 32 धावा काढल्या. शेफर्डने 20 व्या षटकात नॉर्खियाला 32 धावा काढल्या. त्याच 32 धावा दिल्ली कॅपिटल्ससाठी महागात पडल्या. दिल्लीचा 29 धावांनी पराभव झाला. यावेळी दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन रिषभ पंतने पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय दिल्लीच्या अंगलट आला. दिल्लीपुढे मुंबई इंडियन्सने 5 बळी गमावत 234 धावांचे आवाहन ठेवले. मुंबईने दिलेल्या आवाहानाचा पाठलाग करताना रिषभ पंतचा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी अभिषेक पोरेलला पाठवण्याचा निर्णय चुकला. अभिषेक पोरेलनं 41 धावा केल्या मात्र, त्याचे स्ट्राइक रेट जसं हवं होतं तसं नव्हते. दिल्लीकडून पृथ्वी शॉने 66 धावा केल्या. तर, स्टब्सने 25 बॉलमध्ये 71 धावा केल्या. दिल्लीचे इतर फलंदाज मात्र चांगली कामगिरी करु शकले नाही.
मुंबईने विजयाचं खातं उघडलं
मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या विजयाची प्रतीक्षा होती. अखेर मुंबई इंडियन्सनं दिल्लीवर विजय मिळवला आहे. मुंबईनं पहिला विजय मिळवला असून आता त्यांचा सामना दोन बलाढ्य संघांसोबत होणार आहे. 11 एप्रिलल मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अशी मॅच होईल. तर, 14 एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने सामने येतील.