। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील चिरनेर येथील वारकरी संप्रादायाच्या मुक्ताबाई शंकर मोकल (90) यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर वारकरी संप्रदायाच्या तसेच विविध क्षेत्रातील मंडळींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि सहा मुली, सुना, जावई, नातवंडे, पंतवंडे असा आप्त परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी मंगळवारी (दि.16) श्रीक्षेत्र चिरनेर खाडी येथे होणार आहे. तर, उत्तरकार्य विधी गुरुवारी (दि.18)चिरनेर येथील राहत्या घरी दुपारी बारा वाजता होणार असल्याची माहिती मुलगा दत्तात्रेय मोकल व काशिनाथ मोकल यांनी दिली.