| मुंबई | वृत्तसंस्था |
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला अटक करण्यात आली आहे. हार्दिक आणि कृणाल पांड्या या दोघांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याचा सावत्र भाऊ वैभव पांड्याला अटक करण्यात आली आहे. हार्दिकच्या सावत्र भाऊवर 4.3 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आह,े असे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी सांगितले. 2021 मध्ये तिघांनी मिळून पॉलिमर व्यवसाय सुरू केला होता. हार्दिक आणि कृणाल दोघांकडे 40% शेअर्स तर वैभवकडे उर्वरित 20% शेअर्स होते.