पेण | वार्ताहार |
जे.एस.डब्ल्यू स्टील कंपनीच्या जनसंपर्क कार्यालयासमोर झालेल्या मारहाणीवरुन पेणमधील शिवसेना नेत्याला पोलिसांनी अटक करुन त्यांच्यावर अॅट्रॉसीटी कलम लावण्यात आले शिवाय न्यायालयाकडून अलिबाग व पेण तालुक्यात संचार करण्यास बंदी आली. जे.एस.डब्ल्यू कंपनीने या नेत्याच्या बरोबर असलेले व्यावसायीक सर्व संबंध तोडले त्यामुळे सगळेच आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने वैफल्लग्रस्थ झालेला हा नेता वेगळ्याच वावड्या उठवून अफवांना खत पाणी घालत आहे.
ी जे.एस.डब्ल्यू कंपनीने माझ्या पुढे लोटांगण घातली आहे. आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगून वरच्या पातळीवर सदर ची केस निकाली काढली. एक ना अनेक अफवांचा पिक सध्या वडखळ परिसरात आलेला आहे. आणि या अफवांना खत पाणी घालण्याच काम देखील या नेत्याचे बगलबच्चे करत आहेत. काल पर्यत ज्या शिवसेनेला अद्वातद्वा बोलणारा हा नेता आता एकनिष्ठेचा डिंगा मारतोय. एका रात्रीत आमदारकीच्या उमेदवारीसाठी घडयाळ बांधणारा. हा माणूस शिवसैनिक असल्याच सांगत आहे. या बाबत जे.एस.डब्ल्यू कंपनीच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आत्माराम बेटकेकर यांच्या बरोबर संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, फक्त जे.एस.डब्ल्यू कंपनीच्या नावाने अफवा उडवून स्वतःच्या प्रसिध्दिचा स्टंट आहे. गुन्हा मागे घेण्याचा काही संबंधच येत नाही. केलेल्या कृत्याचे कंपनी कधी समर्थन करणार नाही,असे सुचित केले.