। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील बाहे गावचे शेतकरी तसेच वारकरी संप्रदायाचे पाईक नंदू सहदेव पवार यांचे शनिवारी (दि.13) राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी ते 80 वर्षांचे होते.
नंदू पवार यांनी आपल्या हयातीत शेती व्यवसाय सांभाळून सामाजिक कार्यात सक्रीय राहून समाज व गावासाठी खुप मोलाचे योगदान दिले. तसेच, परिवारावर आतोनात प्रेम करून आपली मुले व नातवंडे यांना चांगले सुसंस्कारित केले.
त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे दशक्रियाविधी सोमवारी (दि.22) तर अंतिम धार्मिकविधी विधी बुधवारी (दि.24) राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.