। नागोठणे। वार्ताहर।
नागोठण्यातील प्रभू आळी भागातील सद्गुरू श्री अनिरूध्द उपासना केंद्रातर्फे रविवारी (दि.14) आयोजित केलेला श्री अनिरूध्द आनंदी उत्सव पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा पालखी सोहळा नागोठण्यातील विविध भागांतून फिरविण्यात आला. श्री अनिरूध्द आनंदी उत्सव पालखी नागोठण्यातील खडक आळी भागामध्ये श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास केंद्रासमोर पालखीचे स्वागत केले. यावेळी उपस्थित श्री अनिरुध्द बापु भक्त, ग्रामस्थ आणि स्वामी भक्त यांनी एकच जल्लोष आणि आनंदी उत्सव साजरा केला. यावेळी उपस्थित सर्वांनी पालखीचे दर्शन घेतले.