। अलिबाग । प्रतिनिधी ।
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळींच्या प्रचार दौऱ्यांना प्रारंभ झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रसे शरदचंद्र गटाचे प्रमुख शरद पवार येत्या 23 एप्रिल रोजी माणगावमध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक उद्या मंगळवारी (दि.16) आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेकापचे तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी केले आहे.