। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
महागाईने कहर केला असून घरखर्चाचे नियोजन करताना गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. स्वयंपाकाचा गॅस महागल्याने अनेक महिलांचा कल सध्या चुलीकडे वळला आहे. त्यामुळे चुलीसाठी लागणार्या सरपणाची ग्रामीण भागात मागणीही वाढली आहे. चुलीवर शिजवलेल्या जेवणाची लज्जत वेगळीच असते. शिवाय घरखर्च कमी होण्यासाठी या परिसरात अनेक घरांमध्ये चुलींवर स्वयंपाक होताना दिसत आहे. या गृहिणींना सरपण पुरवण्यासाठी लाकडाची मोळी विकणार्या आदिवासी महिला खालापुर तालुक्याच्या परिसरात दिसत असून हेच त्यांच्या रोजगाराचे साधन बनले आहे.







