। मुंबई । प्रतिनिधी ।
दरवर्षीप्रमाणे यंदाही कालनिर्णय तर्फे वाचकांसाठी पाकनिर्णय 2025 ही पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी तंदूर/ग्रिल्ड पदार्थ, धिरडी/थालीपीठ/डोसा, केक, नट्स आणि सीड्स वापरून बनवलेले पदार्थ असे चार विभाग ठरवण्यात आले असून सहभागी होउ इच्छिणार्या स्पर्धकांनी आपल्या पाककृती याच विभागांतर्गत पाठवणे आवश्यक आहे.
प्रत्येक स्पर्धक जास्तीत जास्त दोन विभागांसाठी आपली पाककृती पाठवू शकतो. स्पर्धकांनी आपली पाककृती आणि पाककृतीचा स्पष्ट फोटो paknirnay@kalnirnay.com या ईमेलवर किंवा पोस्ट/कुरियरने ‘पाकनिर्णय स्पर्धा-2025, सुमंगल प्रेस प्रा. लि., 172, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय इमारत, एम.एम.जी.एस.मार्ग, दादर (पू.), मुंबई-400014’ या पत्यावर पाठवावा. तसेच, पाककृती www.kalnirnay.com/paknirnay या लिंकवर अपलोड करु शकता. प्रथम आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक त्यानंतर पदार्थाचे नाव, साहित्य आणि कृती याच क्रमाने पाककृती लिहून पाठवायची आहे. पाककृती पाठवण्याची अंतिम (दि. 31) मे आहे.
प्रत्येक विभागातून तीन विजेते निवडण्यात येतील. सर्वोत्कृष्ट 12 पाककृती ‘कालनिर्णय मराठी 2025’, तर उत्तेजनार्थ 18 पाककृती ‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक 2024’ मध्ये प्रसिध्द करण्यात येतील. काही खास पाककृती ‘स्वादिष्ट 2025’ मधून प्रसिध्द होतील. स्पर्धेबाबतचा परीक्षकांचा आणि कालनिर्णय व्यवस्थापनाचा निर्णय अंतिम असेल.