| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |
आगामी लोकसभा निवडणुकीत मावळ मतदार संघातील पनवेल आणि मावळ विधानसभा मतदार संघात आपल्यालालाच आघाडी मिळेल असा आत्मविश्वास महाविकास आघाडी आणि महायुतीचे दोन्ही उमेदवार व्यक्त करत आहेत. मात्र, 2019 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन युती आणि आघाडीच्या उमेदवारांना पडलेल्या मतांची आकडेवारी पाहता राज्यात घडलेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडी नंतर बदललेल्या समीकरणानुसार आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर पनवेल आणि उरण विधानसभा मतदार संघातील उमेदवारीची गणिते जुळणार असल्याने लोकसभा निवडणुकीत आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या पारड्यात जास्तीत जास्त मत पाडून घेण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष कामाला लागले आहेत.
2019 सालच्या विधानसभा निवडणुकाणा भारतीय जनता पार्टी आणि एकसंघ असलेली शिव सेना एकत्रित पणे सामोरे गेले होते. त्या वेळी पनवेल विधनसभेची जागा भाजपा च्या वाट्याला आल्याने भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांचा विजयी निश्चित करण्यासाठी शिव सेनेचे पनवेल मधील कार्यकर्ते झटले होते. याचाच फायदा होऊन 2019 ची निवडणूकीत प्रशांत ठाकूर 92 हजारा पेक्षा जास्तच्या मताधिक्याने विजयी झाले होते. तर त्यांच्या विरोधात शेतकरी कामगार पक्ष आघाडीकडून लढलेल्या हरेश केणी यांच्या पारड्यात 86 हजारा पेक्षा जास्तची मते पडली होती. मिळालेल्या मतांच्या टक्केवारी नुसार प्रशांत ठाकूर यांना 59 टक्क्या पेक्षा जास्त मतदारांनी पसंती दाखवली तर हरेश केणी यांच्यावर 28 टक्के मतदारांनी विश्वास दाखवत 4 टक्के मतदारांनी नोटाला मत देत विधानसभेसाठी रींगणात असलेल्या सर्वच उमेदवारांना नाकारले.
12 हजारा पेक्षा जास्त मतदारांनी त्या वेळी नोटा ला मतदान करत तिसर्या क्रमांकाची मते नोटाला दिली.यंदा मात्र हे गणित बदलणार आहे. दुभंगलेल्या शिव सेनेचा एक गट भाजपा सोबत तर दुसरा गट शेकाप, राष्ट्रवादी आणि कॉग्रेस सोबत मैदानात आहे. सध्याची राजकीय समीकरण पाहता पनवेल विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना लाखा पेक्षा जास्तचे मताधिक्य मिळवून देण्याचा संकल्प आ. ठाकूर यांनी केला असला तरी तालुक्यातील मतदारांचा नैना विरोधात असलेला रोष तसेच पालिकेच्या मालमत्ता करा विरोधात असलेल्या रोशातून कॉलनी फोरमने नुकताच उद्धव ठाकरे गटात केलेल्या प्रवेशा मुळे तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेर पाटील यांना यंदा शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ मिळणार असल्याने लोकसभा निवडणुकीत बारणे यांना आघाडी मिळवून देण्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांचे विधानसभेचे गणित ठरणार आहे.
पनवेल पेक्षा उरण अवघड 2019 साली पनवेल विधानसभा मतदार संघात महायुतीतील घटक पक्षातील कार्यकर्ते एकदिलाने कामाला लागले होते. त्याच वेळी शेजारील उरण मतदार संघात मात्र, भाजपाच्या महेश बालदी यांनी बंडखोरी करत महायुतीचे उमेदवार मनोहर भोईर याच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत महायुतीचे गणित बिघडवले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकाला नुसार 74 हजार 559 म्हणजेच 34 टक्के मतदारांनी अपक्ष उमेदवार बालदी यांच्या पारड्यात आपली मत टाकली त्या खालोखाल महायुती मधील घटक पक्ष असलेल्या शिव सेनेचे उमेदवार मनोहर भोईर यांना 68 हजार 839 म्हणजेच 31 टक्के तर शेतकरी कामगार पक्ष आघाडीकडून निवडणूक लढलेल्या विवेकानंद पाटील यांना 61 हजार 601 म्हणजे 28 टक्के मतदारांनी आपली पसंती दर्शवली होती. निकालानंतर मतांच्या टक्केवारी नुसार पराभूत झालेल्या उमेदवारांना मिळालेल्या टक्केवारीचा आकडा विजयी उमेदवारा पेक्षा जास्त असल्याने तसेच विरोधात लढलेले दोन्ही पक्ष आता एकत्र असल्याने बारणे यांच्या पारड्यात जास्तची मत टाकण्यासाठी आ. बालदी यांना झगडावे लागणार आहे.