। भंडारा । वृत्तसंस्था ।
पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे., तर दोन पोलीस गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
ही घटना भंडाऱ्याच्या दवडीपार गावाजवळ सोमवारी (दि.22) रात्रीच्या सुमारास घडली. पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली आहे. दोन भरधाव वाहन अचानक आमोरासमोर आल्याने झालेल्या या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर, दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. कुणाल सुरमवार (वय 30) असं मृतक तरुणाचं नावं आहे, तर जखमी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये दिनेश बागडे (वय 29) आणि मुकेश पांडेकर (वय 40) यांचा समावेश असून त्यांच्यावर भंडारा शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघाताची माहिती मिळातच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी संशयित आरोपी पोलीस कर्मचारी मुकेश पांडेकर याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास कारधा पोलीस करत आहेत.







