| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड शहरातील फातीमा कुलसुम बेगम हॉस्पीटल येथील मागच्या बाजुस गटारातुन दोन साप बाहेर येत असल्याने हॉस्पिटलच्या कर्मचार्यांनी ताबडतोब सर्पमित्र संदिप घरत यांना बोलवण्यात आले. त्वरीत सर्पमित्र येऊन पाहणी केली असता धामण असल्याचे निदर्शनास आले. सर्पमित्रांनी धामणीला पकडण्यात यश आले. सर्पमित्र संदिप घरत यांनी सांगितले की धामण साप असुन दोन्ही नर असुन हे दोघे जण गटारातुन बाहेर येऊन मारामारी करत असताना येथील कर्मचार्यांना दिसलं. जसं माणसांमध्ये मारामारी होत असते तसं प्राणी मध्ये मारामारी होत असतात. तरी नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. अशि प्रतिक्रिया सर्पमित्र संदिप घरत यांनी दिली.