आर.जे. रॉयल्स संघ विजयी
| पोयनाड | क्रीडा प्रतिनिधी |
झुंझार युवक मंडळ पोयनाड ह्या संस्थेच्या 62 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या झुंझार पोयनाड प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेत आर.जे. रॉयल्स संघाने अंतिम विजयी संघ होण्याचा मान मिळवला आहे. अंतिम सामन्यात जय मल्हार 11 संघाचा पराभव करत स्पर्धेत अव्वल स्थान प्राप्त केले. दि. 27 व 28 एप्रिल रोजी झुंझार युवक मंडळाच्या सुसज्ज मैदानावर स्पर्धा यशस्वी रित्या पार पडली.
स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष जयंत नाईक, अन्वर बुराण, किशोर तावडे, दिपक साळवी, अजय टेमकर, भूषण चवरकर, अजित चवरकर, किशोर जैन, नंदकिशोर चवरकर, शैलेंद्र गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी झाले होते. संपूर्ण स्पर्धा हि झुंझार युवक मंडळाच्या सर्व आजी माजी खेळाडू, व्यापारी असोसिएशनचे सदस्य व पोयनाडच्या सर्व युवा खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आली होती.
प्रत्येक संघाला संघमालक व आयकॉन खेळाडू दिला होता व नंतर औकॅशन करून सर्व सहभागी खेळाडूंना विविध संघात विभागून देण्यात आले होते. खेळाडूंनी परिधान केलेल्या विविध रंगांच्या गणवेशात खेळाडू झळकून दिसत होते. दोन दिवस उत्स्फूर्तपणे खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेऊन खेळाचा आनंद घेतला. संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू खेळ करणाऱ्या चैतन्य राऊतला मालिकावीर व अंतिम सामन्यासाठी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. उत्कृष्ठ फलंदाज मृण्मय पालव, उत्कृष्ठ गोलंदाज राहुल जैन तर उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक म्हणून प्रणय साळवी यांची निवड करण्यात आली.
प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 10 हजार व भव्य आकर्षक चषक आर. जे. रॉयल्स संघमालक राज जैन व कर्णधार चैतन्य राऊत यांना देण्यात आले. द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 6 हजार व चषक जयमल्हार संघाचे संघमालक विकास कामठे व कर्णधार प्रणय साळवी यांना देणार आले. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष अन्वर बुराण, सुनील पाटील, अनिता गंभीर, भूषण चवरकर, संध्या पाटील, किशोर तावडे, दिपक साळवी, नंदकिशोर चवरकर, सुजित साळवी, किशोर जैन, भरत जैन, जितेंद्र जैन, महेश अग्रवाल, प्रदिप जैन, अक्षय अग्रवाल, अमोल खैरनार, शैलेश पाटील, अँड. पंकज पंडित, देवेंद्र गंभीर, संदीप जोशी, संकेश ढोले, आदेश नाईक यांच्यासह पोयनाड व्यापारी असोसिएशनचे सर्व प्रमुख सदस्य, ग्रामस्थ व खेळाडु मोठ्या संख्येने उपस्थित होते.