| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव येथील तरुण उद्योजक तथा नगरपंचायतीचे माजी नगरसेवक नितीन विष्णू बामगुडे यांना आविष्कार फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा शाखेच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2024 जाहीर झाला असल्याची माहिती निवड पत्र पाठवून फाऊंडेशनचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार संजय पवार व रायगड जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे यांनी दिली.
या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. 12 मे रोजी सकाळी 11 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, बाजीप्रभू देशपांडे चौक, पन्हाळगड, जि. कोल्हापूर याठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे. नितीन बामगुडे यांना महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, संस्थेचे रायगड जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.