| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
ग्रामस्थ मंडळ नांदगाव, लायन्स क्लब मुरुड, अंश फाऊंडेशन मुंबई व समता फाऊंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने नांदगावमध्ये झालेल्या मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात पन्नास जणांची नेत्रतपासणी करण्यात आली, तर पंधरा जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतनगर विद्यालयात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत झालेल्या या शिबिरात यशवंतनगर पंचक्रोशीतील पन्नास जणांची तपासणी डॉ. आशिष पारधी, डॉ. हर्षद गोरे यांनी रुग्णांची तपासणी केली, तर श्रावणी मसुरकर, पॅथॅलॉजिस्ट प्रचिती केणी. सुजित पाटील आदींनी मोठे सहकार्य केले.
लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या सीईओ शुभदा कुडतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब मुरुडचे अध्यक्ष मकरंद कर्णिक, उपाध्यक्ष सनी सोगावकर, नयन कर्णिक, नैनिताल कर्णिक, ॲड. आशिष देशपांडे, विशाल उमरोटकर, सुरेश मालवणकर, दिपेश मोदी, नरेश कुबल, विकास देशपांडे आदींनी या शिबिरासाठी मेहनत घेतली.