| रायगड | प्रतिनिधी |
शिवडी ते न्हावा शेवा सागरी सेतू सुरू झाला आहे. अलिबागकरांची बऱ्याच वर्षाची प्रतिक्षा संपली असून रेवस करंजा पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मुंबईजवळ येणार आहे. अलिबाग तालुक्यात तिसरी मुंबई होणार इमारती उभ्या राहणार इमारत बांधकामात बांबूचा वापर होतो. त्यादृष्टीने सागरगड शेतकरी महासंघ अलिबागचे शेतकरी बांबू लागवड करणार असल्याची माहीती महासंघाचे अध्यक्ष विजय चवरकर यांनी दिली.
महासंघातील शेतकरी भात लागवड करतात. त्याच बरोबर मोठ्या प्रमाणावर भाजी पाला पिकवतात. परंतु भाजीपाला पिकांवर रोगाचे प्रमाण वाढले आहे. त्यातच कमी भावाचा फटका बसतोच. रोगाचे प्रमाण अधिक आहे. ऐन उत्पन्नाच्या वेळी रोगाचा प्रार्दुभाव होतो. शेतकऱ्यांचे आथिक नुकसान होते. त्यामुळे उत्पनाच्या दृष्टीने वेगवेगळे पर्याय शेतकरी शोधत आहे.
पाण्याचा विचार करता बांबूला पाणी लागत नाही. कुंपणाच्याकडेने बांबू लागवड करता येते. मोठ्या प्रमाणात लागवड झाल्यास एकत्र माल पाठवता येईल. बांबुचा बहुउद्देशिय वापर होतो मागणी चांगली आहे. मांडगा, धोपील, मेसा या जाती आहेत. वनविभागाकडुन मिळणारी बांबू लागवड गुतांगुतीची आहे. सुटसुटीत सहज तोडता येणाऱ्या मांडगा, धोपील, मेस अशा बांबूना शेतकरी अधिक पसंती देतात, असे विजय चवरकर म्हणाले.






