। अलिबाग । प्रतिनिधी ।
भगवान गौतम बुध्द, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत रोहिदास, छत्रपती शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारातून समाजात अमुलाग्र बदल घडवून आणला. समाजाचे परिवर्तन करण्यामध्ये महापुरुषांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे महापुरुषांच्या विचारांना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचायला पाहिजेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सुशील वाघमारे यांनी केले. भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा रायगड (उत्तर) आयोजित रसायनी मोहोपाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमधील सभागृहात पदाधिकारी, कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
महामानव विचार जयंती व भारतीय संविधान संरक्षक जन जागृती अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या या मेळाव्याला पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी भारतीय बौध्द महासभेचे राज्याचे अध्यक्ष भिकाजी कांबळे, सरचिटणीस सुशील वाघमारे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्याचे अध्यक्ष भिकाजी कांबळे यांनी सांगितले की, महापुरुषांच्या अथक प्रयत्नांनी आपल्याला न्याय, स्वातंत्र, समता, स्वाभिमान, बंधुता मिळाली आहे. देशातील गोरगरीब आणि नागरीकांचे हक्क संरक्षीत केलेले आहेत. परंतु, काही लोक संविधान बदलण्याची भाषा बोलत आहेत. मागील दोन वर्षापासून संविधान रथ आणि विविध कार्यक्रमामध्ये संविधान संरक्षण जनजागृती सुरू आहे. संविधान संरक्षणासाठी काम करत रहा असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी राज्याचे कोषाध्यक्ष विजय कांबळे, सुनंदा वाघमारे, रमाताई गांगुर्डे, रायगड उत्तरच्या महिला अध्यक्षा उषा कांबळे, महिला सरचिटणीस छाया गवई, सरचिटणीस विजय कांबळे, महिला कोषाध्यक्ष त्रिशिला सावळे, राजेश भालेराव, कमळ कांबळे, संतोष जाधव, दर्शर्ना टोणगे, गणेश कांबळे, हसुराम कांबळे, सिध्दार्थ गायकवाड, दिपक कांबळे, दिपा कांबळे, ज्योती क्षीरसागर, सदानंद वाघपंजे, संपदा गायकवाड, मंगला शिंदे, प्रतिभा अहिरे, शोभा गवळे, पुष्पा डोंगरे, चंद्रकांत सोनावणे, अमोल शेजवळ, ज्योती सकपाळ, सुप्रिया वाघपंजे, श्रृर्ती मोरे, महेंद्र निकाळजे, राहुल कांबळे, अर्चना बाबरे हिराबाई हिरे, कृष्णा मोरे, सुवर्णा वाघमार, रायगड जिल्हा, तालुका, शहर, विभागाचे सर्व आजी माजी पदाधिकारी, केंद्रिय शिक्षक, शिक्षिका, माजी श्रामणेर, बौध्दाचार्य, समता सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.