| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुड-मुंबई रस्त्यावर विहूर गावानजीक एका व्यागनर कारमुळे चार वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. सर्व पर्यटक सुखरूप असल्याचे दिसून आले. शनिवार असल्याने मुरूड जंजिरा पाहण्यासाठी पर्यटक मुरूडला येत आहेत. आज सायंकाळी ४:३० च्या सुमारास मुरूड-मुंबई मार्गावर विहूर गावाजवळ असलेल्या एक लाॅजच्या बाहेर चार कार उभ्या होत्या. त्याचवेळी मुरूड जंजिरा पाहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुण्याच्या व्यगनर गाडीने उभ्या गाड्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे या तिन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले व चौथ्या गाडीला किरकोळ नुकसान झाले आहे.







