| कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील किल्ला येथील ग्रेगोरियन पब्लिक स्कूलच्या सीबीएसई दहावीमध्ये आर्या सुनील बडे 97 टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ग्रेगोरियन पब्लिक स्कूलच्या सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. शाळेत 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे नऊ विद्यार्थी आहेत. यावर्षी 93 मुले दहावीच्या परीक्षेसाठी बसली होती. त्या सर्व मुलांनी यश मिळवत शाळेची यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या शाळेत द्वितीय क्रमांक शार्वी आरेकर 95 टक्के गुण, तृतीय क्रमांक प्रिशा जैन 94.6 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका रेमोल वर्गीस, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.