| कोलंबो | वृत्तसंस्था |
खळबळ उडवणारी एक बातमी समोर आली आहे. ब्रिटनचे नागरिकत्व असलेला मूळ बांगलादेशी तमिम रेहमान हा लंका प्रीमियर लीगमधील दांबुला थंडर्स संघाचा मालक आहे. त्याला मॅच फिक्सिंगसंदर्भातील संयशास्पद हालचालींमुळे अटक करण्यात आली आहे. श्रीलंका क्रीडा मंत्रालयाच्या विशेष तपास टीमने रेहमान याला अटक केली असल्याचे समजत आहे. कोलंबो दंडाधिकारी न्यायालयाने त्याला 31 मेपर्यंत कोठडी सुनावली आहे. लंका प्रीमियर लीगमध्ये इम्पिरियल स्पोर्टस ग्रुपने दांबुला संघाची मालकी एप्रिल महिन्यात घेतली. ही कंपनी बांगलादेशातील आहे. बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर रेहमानला न्यायालयाच्या निर्णयानंतर अटक करण्यात आली. त्याची मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजी करणे या आरोपांमध्ये चौकशी करण्यात येणार आहे. श्रीलंका प्रीमियर लीग 1 ते 21 जुलैदरम्यान खेळवण्यात येणार आहे.