। माथेरान । वार्ताहर ।
अश्वपाल संघटनेचे आधारवड हेमंत बिरामणे यांचे 22 सप्टेंबर रोजी कोरोनामुळे निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात त्यांच्या जाण्याची उणीव भासू नये याकामी हेमंत बिरामणे यांच्या नावाचा नाका शहराच्या मध्यवर्ती भागात असावा यासाठी धनगर समाजाचे अध्यक्ष अश्वपालक राकेश कोकळे यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयात निवेदन सादर केले होते.याची दखल घेत महात्मा गांधी मार्गावर स्व.हेमंत सहदेव बिरामणे यांच्या नावाने हेमंत नाक्याचे अनावरण नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी सुरेखा भणगे( शिंदे),प्रसाद सावंत,आकाश चौधरी,चंद्रकांत चौधरी,प्रकाश सुतार,प्रदीप घावरे,राकेश कोकळे, सुनील शिंदे,प्रवीण सकपाळ, विलास पाटील,किरण चौधरी,वसंत कदम,गजानन अबनावे यांसह नगरसेवक,अन्य पक्षाचे सदस्य, नागरीक,हेमंत बिरामणे यांचे नातेवाईक तसेच अश्वपालक मोठया संख्येने उपस्थित होते.