। खांब । वार्ताहर ।
बीज चांगले असेल तर फळही चांगले येते अशाप्रकारचे विचार मा. सरपंच प्रकाश थिटे यांनी रोहा तालुक्यातील वैजनाथ या गावी व्यक्त केले.
सूरगडाच्या पायथ्याशी वसलेल्या वैजनाथ या गावचे पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त अधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते मारूती सावरकर यांच्या 70 व्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या कार्यक्रमांतर्गत आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी मा. सरपंच मनोज शिर्के, गोपनीय अधिकारी नरेश पाटील, संतोष दळवी, गणेश महाडिक, संदीप बाईत, दत्ता वातेरे, सुरेखा पार्टे, ज्योत्स्ना मुंढे, सचिन मुंढे, राजेंद्र खरिवले, मनोज सावरकर, समिधा सावरकर, विनोद सावरकर, वैष्णवी सावरकर, मारूती रटाटे, अनिता रटाटे, तुकाराम बाईत, गणपत मोंडे, रोहिदास सानप, संभाजी शिर्के, वैभव सावरकर, प्रदीप सावरकर, चिंतामणी सावरकर, किशोर सावरकर, प्रशांत सावरकर, निवृत्ती पवार, सुरेखा पवार, चिंदु चतळकर, अनंता चितळकर, शेखर वेदक, रामचंद्र रटाटे आदी प्रमुख मान्यवरांसह सावरकर परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.