आठ जणांच्या सुटकेकरिता बचावकार्य सुरू
। उत्तराखंड । वृत्तसंस्था ।
उत्तरकाशी जिल्ह्यात मंगळवारी सहस्त्रतालच्या ट्रेकसाठी गेलेल्या बावीस सदस्यीय ट्रेकिंग ग्रुपमधील 8 जणांचा खराब हवामानामुळे मृत्यू झाला आहे. या उर्वरित 14 ट्रेकिंग मेंबर्स अडकल्याची माहिती समोर आली होती. या घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच त्यांनी बुधवारी सकाळी एक पथक रवाना करून अडकलेल्या ट्रेकर्सला वाचवले आहे.
बावीस जणांचा ग्रुप सहस्त्रताल या ठिकाणी ट्रेकसाठी निघाला होता. त्यात कर्नाटकातील 18 सदस्य आणि महाराष्ट्रातील 1 आणि 3 स्थानिक ट्रेकर्सचा समावेश आहे. सर्व ट्रेकर्स 7 जूनपर्यंत परत येणार होते. ट्रेकिंग दरम्यान अचानक खराब हवामानामुळे, दाट धुके आणि बर्फवृष्टीमध्ये टीम अडकली. तेथे योग्य व्यवस्था नसल्याने ट्रॅकर्संना पूर्ण रात्र थंडीत काढावी लागली. थंडीमुळे 8 ट्रेकर्सचा मृत्यू झाल्याची बातमी टीमला ट्रॅकवर घेऊन जाणाऱ्या ट्रॅकिंग एजन्सीच्या मालकाने त्याच्या संस्थेच्या अधिकाऱ्याला दिली.
बचाव कार्य सुरू सहस्त्रतालच्या ट्रेकिंग मार्गावर अडकलेल्या ट्रेकर्सना वाचवण्यासाठी एसडीआरएफ आणि वन विभागाचे बचाव पथक वेगवेगळ्या दिशांनी घटनास्थळी पोहोचले आहे. वनविभागाच्या दहा सदस्यांचे रेस्क्यू आणि बचाव पथक सिल्ला गावाच्या पलीकडे गेले आहे. उत्तरकाशी येथील जिल्हा मुख्यालयातील एसडीएफ टीम बुधवार (दि. 5) रोजी पहाटे टिहरी जिल्ह्यातील बुधाकेदार येथे बचाव कार्य सुरू करण्यासाठी रवाना झाली आहे.
सहा ट्रेकर्सची सुटका सहस्त्रतालमध्ये अडकलेल्या 6 ट्रेकर्सची सुटका करण्यात आली. यामध्ये सौम्या पत्नी विवेक, विनय मुलगा कृष्णमूर्ती, शिव ज्योती, सुधाकर बीएस नायडू, गुरुराज यांची पत्नी सुमृती, सीना यांचा समावेश आहे. सर्व लोक कर्नाटकचे रहिवासी आहेत.