स्थानिक नागरिकांसह प्रवाशांकडून नाराजी
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
गेले तीन ते चार वर्षे रखडलेले मुरुड जंजिरा एसटी बस आगारातील राहिलेले महत्त्वाचे अंतर्गत भागातील काँक्रिटीकरण अद्याप पूर्ण झाले नसल्याने प्रवासी, व्यापारी, मुरुडकर नागरिक संतापले असून, तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. मुरूड तालुका पर्यटन तालुका असल्याने आणि बाहेरील सर्व प्रवाशांची मदार एसटी सेवेवर अवलंबून असल्याने आगारातील बसेस नवीन आणि सुस्थितीत असाव्यात, मात्र अधिक बसेस जुन्याच आहेत.
मुरूड आगारातील काही भागाचे काँक्रिटीकरण यापूर्वीच झाले आहे. मात्र, काही महत्त्वाचे भागाचे काँक्रिटीकरण तीन वर्षे रखडले आहे. पावसात सध्या काही भागात काँक्रिट ओतण्यात आले आहे; मात्र हे कामदेखील थांबले आहे. आगाराच्या प्रवेशद्वारावर दरवर्षी पावसाळ्यात शेकडो खड्डे पडतात, यातून प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. दरम्यान, खड्ड्यात पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम शुक्रवारी सुरू करण्यात आले आहे.