मुंंबई | प्रतिनिधी |
परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने दुसरं समन्स बजावलं आहे. 28 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याबद्दल परब यांना हे समन्स बजावण्यात आलं आहे. आशा आहे की आता तरी अनिल परब चौकशीला हजर राहतील, असं खोचक ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये ही समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे.