। आगरदांडा । प्रतिनिधी ।
वटपौर्णिमा उत्सव हा येत्या शुक्रवारी (दि.21) येत असुन या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुरुड मुख्य बाजारपेठ विविध साहित्यांनी सजली होती. बुधवारी सकाळपासून पाऊसाची रिमझिम सुरू असली तरी शहरांसह पंचक्रोशी भागातील महिलांनी वटपौर्णिमेच्या पुजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी महिलांच्या बरोबरीने पुरुष देखील पुजेचे साहित्य बाजारातुन खरेदी करताना दिसत होते. पुजेच्या साहित्यामध्ये आरसा, फणी, हळदीकुंकू करंडे, काळे मणी, मंगळसुत्र व वडाला गुंडाळण्याकरिता धागा तसेच फळांमध्ये आंबा, फणस, आळु, केळी या विविध साहित्य दुप्पटीने वाढ झालेली दिसुन येत आहे.







