| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील पळस्पे हायवे ट्रॅफिक चौकीजवळ शुक्रवारी पहाटे उभ्या ट्रक चालकाला चार अज्ञात इसमांनी मारहाण करून व त्यांना जखमी करून लुटल्याची घटना घडली आहे.
उदयविर बरनामसिंग श्रीवास्तव (36) हा व त्याचा सहकारी हे त्यांच्या ताब्यातील वाहन क्र.एचआर-38-एबी-6224 हे वाहन थांबवून टायरमधील हवा तपासत असताना अचानक चार अनोळखी इसम त्या ठिकाणी आले व त्यांनी या दोघांना हाताबुक्क्यांनी तसेच एका इसमाने त्याच्या सहकाऱ्यास लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करून त्याला जखमी केले व त्यांच्याकडील रोख रक्कम तसेच मोबाईल फोन असा मिळून जवळपास सात हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला आहे. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.