। पनवेल । वार्ताहर ।
पनवेलजवळील जेएनपीटी ते पळस्पे रोडवरील गव्हाण फाट्याकडून सीबीडीकडे जाणार्या रोडवर बेदरकारपणे उभ्या करून ठेवलेल्या ट्रेलरला स्कुटीची पाठीमागून धडक बसल्याने अपघात झाला. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. ट्रेलर चालक संजयकुमार सिंग (37) याने वाहतुकीच्या नियमाकडे व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रस्त्यावर ट्रेलर थांबविल्याने जयेंद्र पवार (19) हा त्यावेळी पाठीमागून स्कुटीवरुन चालला असताना ट्रेलरला धडकल्याने झालेल्या अपघातात तो गंभीररित्या जखमी होवून मयत झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.