। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघ जुलै महिन्यात झिम्बाब्वे दौरा करणार आहे. या दौर्यामध्ये भारतीय संघ 5 टी-20 मालिका खेळणार आहे. यादरम्यान बीसीसीआयने वेगवान गोलंदाजांसाठी मोठी घोषणा केली आहे.
भारतीय संघ शुबमन गीलच्या नेतृत्वाखाली जुलै महिन्यात झिम्बाब्वेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. यासाठी बीसीसीआयने अनेक नवीन खेळाडूंना संघात समावेश केला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेलाही आयपीएलमध्ये संघात स्थान मिळाले आहे. संघात स्थान मिळण्यासोबतच तुषारचा बीसीसीआयने आपल्या करारात समावेश केला आहे. एका अहवालानुसार, तुषारसह सात गोलंदाजांना वेगवान गोलंदाजीचा करार देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुषार सोबत मयंक यादवलाही वेगवान गोलंदाजीचा करार मिळाला आहे. आकाश दीप, विजय कुमार वैशाक, उमरान मलिक, यश दयाल, विद्वथ कवेरप्पा यांचाही या यादीत समावेश आहे. मयंकच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 17 लिस्ट ए सामन्यात 34 बळी घेतले आहेत. यासह त्याने 14 टी-20 सामन्यात 19 बळी घेतले आहेत. मयंकने एक प्रथम श्रेणी सामना खेळला आहे.