। पनवेल । वार्ताहर ।
मुसळधार पावसाचा फटका अनेकांना बसला. त्यातच पनवेल तालुक्यातील कोप्रोली येथील अरिहंत अरहम सोसायटीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कंपाउंडची भिंत कोसळली. त्यामुळे येथील रहिवासी भयभीत झाले आहेत. पावसामुळे सगळीकडे दाणादाण उडाली होती. नद्या नाल्यांना पूर आले होते. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. कोप्रोली येथील अरिहंत अरहम सोसायटीच्या पाठीमागून नदीच्या बाजूला असलेले कंपाऊंड भिंत रविवारी सकाळच्या सुमारास कोसळली. सकाळी मोठा आवाज झाल्याने रहिवासी त्या ठिकाणी पाहायला गेल्याने गर्दी झाली होती.