कृषी अधिकारी कांबळे यांचे आवाहन
। म्हसळा । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परीषद यांच्या पुढाकारातून कृषी विभाग आणि केंद्र सरकार पुरस्कृत व राज्य सरकार पुरस्कृत अनेक योजना व जिल्हा परिषद सेसमधून शेतकर्यांसाठी मंजूर झाल्या आहेत. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील शेतकर्यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे अर्ज करण्याचे आवाहन कृषी अधिकारी बबनराव कांबळे यांनी म्हसळा तालुक्यातील शेतकर्यांसाठी केले आहे.
यात राज्य शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत सिंचन सुविधा करण्यासाठी अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकर्यांसाठी नवीन विहीर जुनी विहीर दुरुस्ती इनवेल बोरिंग पंप सेट वीज जोडणी शेततळ्यासाठी प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन ठिबक संच, तुषार संच इत्यादी या योजना मंजूर आहेत. राज्य शासनाच्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या शेतकर्यांसाठी नवीन विहीर, जुनी विहीर, दुरुस्ती इंवेल बोरिंग कंपसेट वीज जोडणी शेततळ्याला प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन, ठिबक संच, तुषार संच, पाईपलाईन, परसबाग आधी योजना असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा परिषद सेसमधून सर्वांकष पीक संरक्षण योजनेअंतर्गत 75 टक्के अनुदानाने पीक संरक्षण पुरवठा तसेच 100% अनुदानातील महिला बचत गट शेतकरी गट यांना कडधान्य तसेच भाजीपाला बियाणांचे मिनी किट वाटप, 50 टक्के अर्थ सहाय्याने भुईमुगाचे बियाणे त्याचबरोबर शेतकर्यांची पूर्ण संमती घेऊन खरेदी केलेल्या ताडपत्रीवर 75 टक्के अनुदान व 75 टक्के अनुदानातून शेतकर्यांना सौर ऊर्जेवर चालणारे घरगुती दीपसंच शेतीविषयक सुधारित अवजारे या योजनेतून भाजीपाला लागवड. प्रोत्साहन योजना सेंद्रिय शेती प्रोत्साहन म्हणून जीवामृत व बिजामृत तसेच कंपोस्ट खत निर्मिती व गांडूळ खताची निर्मिती या योजना 85 टक्के अनुदानात केली जाईल, यामुळे शेतकर्यांनी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषिविभाग म्हसळामार्फत करण्यात येत आहे.