112 खेळाडूंचा सहभाग; 66 पुरुष आणि 47 महिला
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला येत्या 26 जुलैपासून सुरूवात होत असून यावेळी एकूण 112 भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत. यात 66 पुरुष तर 47 महिला खेळाडू या मोठ्या स्पर्धेसाठी पॅरिसला जाणार आहेत. 2022 च्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नावावर एकूण 7 पदके होती. ज्यात 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश होता. यंदाच्या या ऑलिम्पिकमध्ये भारताकडून कोणकोणत्या खेळासाठी कोणते खेळाडू पात्र ठरले आहेत, याची एक सविस्तर यादी जाहिर करण्यात आली आहे.
नीरज कुमारने 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. यंदाच्या ऑलिम्पिकमध्येही नीरजकडून देशाला सुवर्णकामगिरीची अपेक्षा आहे. नीरजशिवाय बॅडमिंटन आणि हॉकी संघाकडूनही भारताला पदकांची आशा आहे. यावेळी भारतीय हॉकी संघ सुवर्णपदक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. कुस्तीत विनेश फोगटकडून पदकाच्या आशा आहेत. यावेळी सात्विक-चिरागच्या जोडीवर विशेष लक्ष असेल. याशिवाय लव्हेलिना-निखत यांच्याकडून बॉक्सिंगमध्येही भारतीय चाहत्यांना पदकाची आशा असेल.
भारतीय खेळाडूंची यादी
नेमबाजी
पृथ्वीराज तोंडाईमन, राजेश्वरी कुमार, संदीप सिंग, अर्जुन बबुता, स्वप्निल कुसळे, ऐश्वर्य प्रताप सिंग, सिफत कौर समरा, अंजुम मौदगिल, एलावेनिव वेल्वारिय, रमिता जिंदाल, संदीप सिंग, अर्जुन बाबुता, रमिता जिंदाल, अर्जुन चिमी, सरबज्योत सिंग, मनू भाकर, रिदम संगवम, विजयवीर सिद्धू, अनिश भानवाला, मनू भाकर, ईशा सिंग, सरबज्योत सिंग, अर्जुन चीमा.
अॅथलेटिक्स
अक्षदीप सिंग, प्रियांका गोस्वामी, विकास सिंग, परमजीत सिंग बिश्त, अविनाश साबळे, पारुल चौधरी, ज्योती याराजी, किरण पहल, तजिंदरपाल सिंग तूर, आभा खटुआ, सर्वेश कुशारे, प्रवीण चित्रवेल, अब्दुल्ला अबूबकर, मुहम्मद अनस याहिया, मोहम्मद अजमल, अमोज जैकब, संतोष तमिलारासन, राजेश रमेश, विद्या रामराज, ज्योतिका श्री दांडी, एमआर पूवम्मा, सुभा व्यंकटेशन, प्रियांका गोस्वामी, सूरज पनवार.
बॉक्सिंग
निखत जरीन, अमित बुरशी, निशांत देव, प्रीती पवार, लव्हलिना बोरगोहेन, जास्मिन लांबोरिया.
बॅडमिंटन
एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन, पीव्ही सिंधू, सात्विकसाईराज रँकीरेड्डी, चिराज शेट्टी, अश्विनी पोनप्पा, तनिषा कृष्टो.
टेबल टेनिस
शरथ कमल, हरमिर देसाई, मानव ठक्कर, मनिका बत्रा, श्रीजा अकुला, अर्चना कामथ.
टेनिस
समित नागल, रोहन बोपण्णा, श्रीराम बालाजी
वेटलिफ्टिंग
मीराबाई चानू
कुस्ती
अमन सेहरावत, विनेश फोगट, अंशू मलिक, निशा दहिया, रितिका हुडा, अंतिम पंघाल.
घोडेस्वारी
अनुष अग्रवाल
गोल्फ
शुभंकर शर्मा, गगनजीत भुल्लर, अदिती अशोक, दिक्षा डागर
हॉकी
महिला आणि पुरुष संघ
ज्युडो
तुलिका मान
रोइंग
बलराज पनवार
नौकानयन
विष्णु सावरणन
नेत्रा कुमानन
पोहणे
धिनिधी देसिंघू, श्रीहरी नटराज
भालाफेक
नीरज चोप्रा, किशोर जेना, अन्नु राणी