। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या एका वक्तव्यावर अवमानकारक टिप्पणी करणे भारताचा युवा क्रिकेटपटू अंगक्रिश रघुवंशीला भारी पडले आहे. ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्यानंतर त्याने आपली चूक मान्य करत माफी मागितली. अलीकडेच एका पॉडकास्टदरम्यान सायना नेहवाल क्रिकेट आणि इतर खेळांबद्दल बोलली होती. या पॉडकास्टची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पॉडकास्टमध्ये तिने इतर खेळांना क्रिकेटपेक्षा शारीरिकदृष्ट्या कठीण असल्याचे म्हटले होते. यावर अंगक्रिश रघुवंशी याने टिप्पणी केली. त्याने सायनाला भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या ताशी 150 किमी वेगाने येणार्या बाऊन्सरचा सामना करण्याचा सल्ला दिला होतो. मात्र, काही तासांनंतर रघुवंशी याला त्याची चूक लक्षात आली आणि त्याने सोशल मीडियावरून आपली पोस्ट डिलीट केली.







